Tuesday, January 4, 2011

कलाकारांचं नवीन वर्ष

वैभव मांगले 

प्रेक्षकांना सरप्राइझ

या वर्षी प्रेक्षकांना माझ्याकडून खूप सरप्राइझेस मिळणार आहेत. मुख्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये वैभव मांगले हे नाव काढल्यानंतर खसखसच पिकते. पण, नव्या वर्षात मी महेश
मांजरेकर यांच्या 'फक्त लढ म्हणा' या सिनेमात व्हीलनचा रोल साकारणार आहे. तसंच एका नाटकात मी आगळ्यावेगळ्या स्त्री भूमिकेत येणार आहे. हे नाटक कॉमेडी आहे.

- अभिनेता
................

प्रिया बापट 

नवं नाटक, नवी भूमिका

वेगळ्या कामाची, नव्या भूमिकेची सुरुवात मी आतापासूनच केली आहे. १ जानेवारीला माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग आहे. त्यामुळे नव्या वर्षांत प्रेक्षकांना माझी भूमिका असलेलं एक चांगलं नाटक पाहायला मिळेल. 'नवा गडी, नवं राज्य' या नाटकाचा पहिला प्रयोग १ जानेवारीला होतोय. प्रत्येक कपलला त्यांच्या आयुष्याशी रिलेट करता येईल, असं या नाटकाचं कथानक असून माझी भूमिकाही तशीच आहे. सो, माझ्यासाठी हे खूप वेगळं आहे. याशिवाय चांगला चित्रपट, चांगली भूमिका मिळाली तर तीही करेनच!

- अभिनेत्री
...........
क्षिती जोग 

कॉमेडीला टाटा

गेले अनेक दिवस मी 'फू बाई फू'मध्ये बिझी होते. याशिवाय, 'सूर्याची पिल्ले' नाटकातील माझी भूमिकाही काहीशी कॉमेडीच होती. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात कॉमेडी सोडून वेगळं काही करण्याचा प्रयत्न करणार आहे. 'स्टार प्लस'वर नव्याने सुरू होणाऱ्या एका हिंदी सीरिअलमध्ये वेगळ्या भूमिकेतील क्षिती प्रेक्षकांना पाहता येईल. खूप भडकपणा, भपकेबाजपणा यापासून दूर जाणाऱ्या मुंबईकर सर्वसामान्य महिलेची ही भूमिका असेल. त्यातील साधेपणा भावल्यानेच ही भूमिका करण्याचा निर्णय मी घेतला. याशिवाय, एक इंग्रजी नाटकही करणार आहे. नवीन चित्रपट किंवा नाटकाचा विचार करतानाही थोड्या वेगळ्या भूमिकांनाच माझा प्रेफरन्स असेल.
..............
दिपा परब 

टार्गेट इण्टरनॅशनल मॉडेल

खरं तर संकल्प म्हणून किंवा ठरवून असं मी काहीच करत नाही. मला जे पटेल, आवडेल तेच मी साकारते. सध्या मी अॅड फिल्म्सवरच लक्ष केेंदीत केलं असून नव्या वर्षात मला एक चांगली इण्टरनॅशनल मॉडेल बनायचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतेय. एक उत्तम मॉडेल बनून आशियाला रिप्रेझेण्ट करण्याची माझी इच्छा आहे. नव्या वर्षात इण्टरनॅशनल मॉडेल म्हणून मी प्रेक्षकांसमोर येईन. त्यादृष्टीनेच प्रयत्न करणं मी महत्त्वाचं मानते.
..........
गिरीश कुलकर्णी 

नव्या वर्षात नवा सिनेमा

नव्या वर्षात आम्ही नवा सिनेमा करतोय. नेहमीप्रमाणे माझी आणि उमेशची जोडी आहे. हा सिनेमा आजच्या काळातला असेल. 'विहीर' हा पर्सनल सिनेमा होता. आमचा नवा सिनेमा मात्र थोड्या लाइटर अँगलचा असेल. हा समकालीन सिनेमा लोकांना पाहताना मजा येईल. शिवाय, आणखी दोन प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. पण, ते अगदीच प्राथमिक स्तरावर आहे. सारांश, या वर्षात आम्ही खूप बिझी असू.

- अभिनेता-लेखक
..............
अजय-अतुल 

नव्या ढंगाचं संगीत

आजवर आम्ही लोकसंगीताचा बेस धरून काम केलं. लोकांनीही त्याला तुफान प्रतिसाद दिला. पण, येत्या वर्षात आम्ही समकालीन संगीत देण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे १९७०-८० च्या काळातलं त्या स्टाइलचं संगीतही आम्ही देतोय. थोडक्यात, आजवर असलेल्या आमच्या प्रतिमेला छेद देऊन पूर्ण नव्या अंगांनी हे संगीत लोकांना ऐकायला मिळेल. याशिवाय, अनेक प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. एक लार्जर दॅन लाइफ असं हे म्युझिक असेल. वेळ आली, की ते रसिकांना समजेलच.

- संगीतकार
......................
स्मिता तांबे
डान्समधलं सरप्राइज

खरं सांगायचं तर समोर येईल, ते काम प्रामाणिकपणे करायचा माझा प्रयत्न असतो. 'एकापेक्षा एक' मध्ये नव्या डान्स फॉर्मवर वर्कआऊट करून स्वत:ला प्रेझेण्ट करून त्यातलंच काहीतरी सरप्राइज प्रेक्षकांना देण्याचा माझा प्रयत्न असेल. याशिवाय 'धूसर' ही फिल्म या वर्षात रिलीज होईल. त्यात माझी नातेसंबंधांवर आधारित अशी अगदी वेगळी भूमिका आहे. याशिवाय, सामाजिक विषय हाताळणारा, बहुचचिर्त 'पांगिरा' हा सिनेमाही यंदा प्रदशिर्त होतोय. यातली माझी व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना एक नवा अनुभव देऊ शकेल.

स्मिता तांबे
..............
अतुल पेठे 

वेगळं नाटक करतोय

यंदा माझ्याकडून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी हटके बघायला मिळणार आहे. पण ते 'काहीतरी' काय आहे, ते मात्र आत्ताच नाही सांगणार मी. फक्त इतकंच सांगतो की, दरवर्षी मी वेगवेगळ्या ठिकाणांहून नाटकं करतो. तसं यंदाचं नाटक मी मुंबईतून करणार आहे. 'दलपतसिंग येती गावा' या हटके नाटकासारखं हे नवीन नाटकही हटकेच असेल. मार्चपर्यंत प्रेक्षकांना हे नाटक पाहायला मिळेल हे मात्र नक्की!

- लेखक
.....................
वीणा जामकर 

स्वत:साठी वेळ देईन

२०१० मध्ये मी खूप वेगवेगळी कामं केली. यात 'दलपतसिंग येती गावा'सारखं नाटक होतं. 'लालबाग-परळ'सारखा सिनेमा केला. मला पुरस्कारही मिळाले. शिवाय कोकणी-मराठी सिनेमेही केले. आता मात्र मी गॅप घेईन. मला वाटतं, इतकं काम केल्यावर एक गॅप येतोच. तो मी माझ्या सेल्फ डेव्हलपमेण्टसाठी वापरणार आहे. या काळात मी खूप वाचेन, अनेक लोकांना भेटेन, फिरायचं तर आहेच. त्यामुळे या वर्षात मजा येणार, हे नक्की! या दरम्यान सिनेमा, नाटक आलं तर ते करेनच. पण, त्यासाठी माझा अट्टहास नसेल.

No comments: