Showing posts with label चित्रकार एम. एफ. हुसेन अनुष्का शर्मा वर फिदा. Show all posts
Showing posts with label चित्रकार एम. एफ. हुसेन अनुष्का शर्मा वर फिदा. Show all posts

Thursday, January 6, 2011

चित्रकार एम. एफ. हुसेन अनुष्का शर्मा वर फिदा

एकेकाळी माधुरी दीक्षितच्या प्रेमात खोलवर बुडालेले प्रसिद्ध आणि वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या ‘ चिरतरुण ’ मनाच्या कॅनव्हासवर सध्या अनुष्का शर्मा या नवोदित नायिकेची प्रतिमा अवतरली आहे. तिचं दिसणं, हसणं, वागणं-बोलणं, पडद्यावरचं वावरणं या सगळ्यावर हा रसिक चित्रकार ‘ फुल टू फिदा ’ झालाय. अनुष्कावरील या प्रेमाखातरच हुसेन यांनी तिचा ‘ बँड बाजा बारात ’ हा चित्रपट आत्तापर्यंत आठ वेळा बघितलाय आणि पुढेही पाहण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे.