- या जगात कुणीच परफेक्ट नाही. आम्हीसुद्धा नाही. म्हणूनच आम्ही जसे आहोत, तसं आम्हाला स्वीकारा.
- आम्हाला बदलण्याचा प्रयत्न करू नका. आमचं काही चुकलं तर नक्की सांगा. आम्ही ते ऐकून घेऊ, समजून घेऊ. काही चुकत असेल, तर ते 'करेक्ट'ही करू.
- त्याने ह्युमरस असलंच पाहिजे. आणि अॅडव्हेंचरसही! आमचा इण्टरेस्ट असणाऱ्या गोष्टीत आम्हाला सोबत केली, तर आम्हाला खूप आवडतं.
- स्त्रियांच्या मताची कदर करा. त्यांचं म्हणणं काय, ते आधी ऐकून तर घ्या. उगीच आम्हाला उडवून लावण्याची घाई नको.
- समस्त स्त्रीवर्गाला सरप्राइजेस आवडतात. आणि ते सरप्राइज तुम्ही दिलं असेल, तर अर्थातच डबल खुशी!
- तुम्ही दुसऱ्यांची तारीफ करायला आमची ना नाही. पण, आमची तारीफही करायला विसरू नका. अगदी आम्ही चांगले दिसत नसलो तरीही.
- तुमच्याकडून मटेरिअॅलिस्टिक गोष्टींची अपेक्षा नसते. जास्तीत जास्त 'क्वालिटेटिव्ह' वेळ एकमेकांबरोबर घालवावा, असंच वाटत असतं.
- येस्स्स, मूड स्विंंग्ज. आहेत आम्हाला मूड स्विंग्ज. कारण, दगदगीच्या क्षेत्रात आम्ही दिवसरात्र काम करत असतो. मग, आम्हाला समजून नको घ्यायला? आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं, की कस्सं बर्रबर्र वाटतं.
- ही शूड बी फुडी! मला खाण्याची आवड आहे म्हणजे त्यानेही माझी ही आवड जपली पाहिजेच. चांगलं, चमचमीत खाताना समोर आलेेल्या अन्नाला नावं ठेवू नका.
- आमच्या कुटुंबाप्रमाणेच आम्ही तुमच्या कुटुंबावरही प्रेम करतो, प्रेम करू. पण, आधी तुमच्या कुुटुंबात आम्हाला अॅडजस्ट तर होऊ द्या, जेल तर होऊ द्या.
Showing posts with label तेजस्विनी पंडित. Show all posts
Showing posts with label तेजस्विनी पंडित. Show all posts
Tuesday, January 11, 2011
तेजस्विनी पंडित
Subscribe to:
Posts (Atom)
