Tuesday, January 11, 2011

तेजस्विनी पंडित

  • या जगात कुणीच परफेक्ट नाही. आम्हीसुद्धा नाही. म्हणूनच आम्ही जसे आहोत, तसं आम्हाला स्वीकारा.
  • आम्हाला बदलण्याचा प्रयत्न करू नका. आमचं काही चुकलं तर नक्की सांगा. आम्ही ते ऐकून घेऊ, समजून घेऊ. काही चुकत असेल, तर ते 'करेक्ट'ही करू.
  • त्याने ह्युमरस असलंच पाहिजे. आणि अॅडव्हेंचरसही! आमचा इण्टरेस्ट असणाऱ्या गोष्टीत आम्हाला सोबत केली, तर आम्हाला खूप आवडतं. 
  • स्त्रियांच्या मताची कदर करा. त्यांचं म्हणणं काय, ते आधी ऐकून तर घ्या. उगीच आम्हाला उडवून लावण्याची घाई नको. 
  • समस्त स्त्रीवर्गाला सरप्राइजेस आवडतात. आणि ते सरप्राइज तुम्ही दिलं असेल, तर अर्थातच डबल खुशी! 
  • तुम्ही दुसऱ्यांची तारीफ करायला आमची ना नाही. पण, आमची तारीफही करायला विसरू नका. अगदी आम्ही चांगले दिसत नसलो तरीही. 
  • तुमच्याकडून मटेरिअॅलिस्टिक गोष्टींची अपेक्षा नसते. जास्तीत जास्त 'क्वालिटेटिव्ह' वेळ एकमेकांबरोबर घालवावा, असंच वाटत असतं. 
  • येस्स्स, मूड स्विंंग्ज. आहेत आम्हाला मूड स्विंग्ज. कारण, दगदगीच्या क्षेत्रात आम्ही दिवसरात्र काम करत असतो. मग, आम्हाला समजून नको घ्यायला? आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं, की कस्सं बर्रबर्र वाटतं. 
  • ही शूड बी फुडी! मला खाण्याची आवड आहे म्हणजे त्यानेही माझी ही आवड जपली पाहिजेच. चांगलं, चमचमीत खाताना समोर आलेेल्या अन्नाला नावं ठेवू नका.
  • आमच्या कुटुंबाप्रमाणेच आम्ही तुमच्या कुटुंबावरही प्रेम करतो, प्रेम करू. पण, आधी तुमच्या कुुटुंबात आम्हाला अॅडजस्ट तर होऊ द्या, जेल तर होऊ द्या.

No comments: