Tuesday, January 4, 2011

आघात मराठी सिनेमा


बॉलिवूडमध्ये हलक्या फुलक्या, रंगीबेरंगी युथफूल आणि विनोदी सिनेमांचे पीक आले असतानाही गंभीर असा वैद्यकीय विषयावरचा सिनेमांना प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल करत आपल्या आवडीचा कौल दिला होता, तसाच पायंडा 'आघात'च्या निमित्ताने मराठीतही पडल्याचे दिसत आहे! विक्रम गोखले यांचा
दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. यात, स्वत: विक्रम गोखले, मुत्ता बवेर्, कादंबरी कदम, अनिकेत विश्वासराव, डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिका रेखाटल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पुढारलेले तंत्रज्ञान, नीतिमत्ता आणि सगळ्याच्या मुळाशी असणारे डॉक्टर आणि पेशंट यांचे नाते या विषयावर हा सिनेमा भाष्य करतो.

विक्रम गोखले यांनी यातल्या विषयाच्या गांभीर्याचा बाज कुठेही ढळू न देता त्याला आवश्यक त्या रंजकतेची फोडणी दिल्यामुळे सिनेमा अखेरपर्यंत पेक्षकांवरची पकड काम ठेवतो. 'खूप दिवसांनी एक चांगला सिनेमा पहायला मिळाल्याचा आनंद झाला', असे आदित्य शानबाग या प्रेक्षकांनी सांगितले. इतर विनोदी सिनेमे कधीही पाहता येतात, पण; हा विषय खूप वेगळा वाटला. मुत्ता बवेर्, विक्रम गोखले सारखे अभिनेते पाहून दोन तास वाया तर नक्कीच जाणार नाहीत याची खात्री होती. या सिनेमामुळे वेळ चांगला गेलाच पण, काहीतरी उत्तम पहायला मिळाल्याचा आनंदही मिळाला, असं ऋजुता चुरी या प्रेक्षकांनी सिनेमा पाहून प्रतिक्रिया दिली.

आपला प्रेक्षक हा सुबुद्ध आहे. त्याला चांगल्या वाईटाची जाणीव आहे. ज्यांना चांगल्या वाईटाची जाणीव आहे. चांगला दर्जा आणि उत्तम विषय त्याच्यासमोर मांडला की, तो त्याला शंभर टक्के स्वीकारतो. कलेद्वारे तुम्ही समाजाला खूप काही देऊ शकता आणि तसाच प्रयत्न मी 'आघात'मधून केला आहे, पेक्षकांनी 'आघात'ला दिलेला प्रतिसाद पाहता एक चांगला विषय मी पहिले दिग्दर्शन म्हणून त्यांच्या पुढे मांडू शकलो याचा मला आनंद वाटतो, असे विक्रम गोखले यांनी सांगितले.

No comments: