Thursday, January 6, 2011

कसाब

इम्रान हश्मी आपल्या कुत्र्याला घेऊन प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो. त्याच्या शेजारी बसलेली सुंदर तरुणी त्या कुत्र्याचं नाव विचारते. तेव्हा इम्रान म्हणतो, याचं नाव आहे कसाब. रस्त्यावरचा आहे, सीएसटी स्टेशनला सापडला होता. हा प्रसंग आहे, मधुर भांडारकरच्या आगामी 'दिल तो बच्चा है जी' या सिनेमामधला. फेब्रुवारी महिन्यात प्रदशिर्त होत असलेला हा सिनेमा कॉमेडी आहे. 

आत्तापर्यंत 'चांदनी बार', 'फॅशन', 'कॉपोर्रेट' असे अनेक रिअॅलिस्टीक सिनेमे देणाऱ्या मधुर कॉमेडी सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमात कसाबचा हा सिक्वेन्स विनोदी पद्धतीने सिनेमात वापरलाय. दोन वर्षांपूवीर् २६ नोव्हेंबरला झालेल्या महाभयंकर हल्ल्यात पोलिसांनी बहाद्दुरी दाखवत कसाबला पकडलं होतं. आजही त्याच्यावरचा खटला सुरू आहे. कसाबबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड संताप आहे. या सिनेमामध्ये शब्दांच्या माध्यमातून कसाबला दिलेली एक छोटीशी चपराकही भारतीय प्रेक्षकाला सुखावून जाईल, असा लेखक संजय छेल यांनी व्यक्त विश्वास सिनेमाचे केला.

No comments: